इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिंक पाठवून चिपळूण तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक.
मोबाईलमधील इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिंक पाठवून चिपळूण येथील तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शुभम शेट्ये (वय २८ वर्षे) याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. शुभम शेट्ये याने मोबाईलवर इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असताना याला त्यावर फ्लिप कार्ड कॉमस कमिशन टास्क या नावाची लिंक व फोटो आला. त्यानंतर अज्ञाताने आपल्या व्हॉट्सअपवर संपर्क साधून एक नोंदणीसाठी लिंक पाठवली आणि तिच्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सागितले. त्या नंतर विविध टास्कच्या माध्यमातून पैसे मिळतील, असे सांगून शुभम शेट्ये याच्याकडून वेळोवेळी टास्कच्या माध्यमातून ३ लाख ८९ हजार ९०० रूपयाची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कायदा नुसार अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.