सर्व रूग्णालयात दरपत्रक लावा, कॉंग्रेसची मागणी.

जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयात शासन निर्णयानुसार दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मात्र रूग्णालय व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने त्याचा मोठा फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. यामुळे सर्वच रूग्णालयात दरपत्रक लावावेत, या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. यासंदर्भात बुधवारी चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना निवेदन देण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button