संरक्षक भिंती कोसळू लागल्याने परशुराम घाटात गॅबियन भिंती उभारणार?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा चौपदरीकरणानंतर परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती एकापाठोपाठ एक कोसळू लागल्याने हा घाट अधिक चर्चेत आला आहे. त्यामुळे या घाटातील माथ्यावर व पायथ्याशी वसलेल्या गावात तसेच प्रवास करणार्या वाहनधारकांतही भीतीचे वातावरण पसरल्याने आता बांधण्यात आलेल्या मात्र धोकादायक वाटत असलेल्या भिंती पडून तेथे गॅबियन भिंत उभारण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विचार सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणचा मातीचा भराव गुरूवारीही कोसळत होता.कोकणातील या महामार्ग चौपदरीकरणात उड्डाणपूल, बांधकामे कोसळणे, रस्ता खचणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. www.konkantoday.com