
रत्नागिरी फिल्म सोसायटीचा एक कल्पक कार्यक्रम साऊंड ऑफ म्युझिक टायटल्स अँड थीम्स.
सिनेमा या दृश्य माध्यामाची भुरळ पडली नाही असा प्रेक्षक विरळाच! कथा सांगण्याच एक परिपूर्ण मध्यम म्हणजे हा सिनेमा… कथा, पटकथा, संवाद, कलाकार, त्यांचा अभिनय या महत्त्वाच्या आणि लक्षणीय गोष्टींच्यासोबत सिनेमाला पूर्णत्व देण्यास मदत करणारा घटक म्हणजे संगीत! भारतीय सिनेमांमध्ये संगीत खूपच वैविध्यपूर्ण पद्धतीने वापरलं गेलंय, पण पाश्चात्य सिनेमाला चार चांद लावण्याचं श्रेय याचं संगीताला जातं. हेच संगीत जेव्हा सिनेमाच्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट संवादाला, कथा पुढे नेण्यासाठी, प्रेक्षकांना कथेच्या कालानुरूप मागे पुढे नेण्यासाठी, एखादी थीम समजावून सांगण्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते थीम संगीत त्या चित्रपटाची ओळख बनतं. एखादीच धून असते अनेकदा पण तेवढी कानावर पडल्यावर कुणाला सिनेमाचं नाव सांगावच लागत नाही. सिनेमाची थीम सहज मनावर कोरून ठेवणारं हे थीम म्युझिक! हेच थीम संगीत ही भारतीय आणि पाश्चात्य सिनेमाचं एक महत्त्वाचं अंग आहे. ह्याच महत्वाच्या घटकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रत्नागिरी फिल्म सोसायटीचा एक कल्पक कार्यक्रम. या कार्यक्रमात काही गाजलेल्या सिनेमांच्या थीम म्युझिकबद्दल बोलणार आहेत, चित्रपट समीक्षक नंदिनी देसाई. प्रेक्षकांशी अधून मधून संवाद साधत ही गप्पांची माहितीपूर्ण मैफल पुढे सरकत राहील. *शनिवार 19 ऑक्टोबर सायंकाळी 7.30 वाजता. हॉटेल व्यंकटेश डायनिगचा सेमिनार हॉल. मारुती मंदिर