प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट, बायको आणि मुलीवर पोक्सो दाखल; एकता कपूर गोत्यात!

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर आणि मुलगी एकता कपूर यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.*शेरा सत्यनारायण पुरोहित यांनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात लहान मुलांच्या छळवणुकीची बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघी मायलेकींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र, या प्रकरणामुळे एकता आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकता कपूर आणि वाद हे समीकरणच झालं आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेली असते. हे वाद अत्यंत गंभीरही असतात. सर्वात आधी एकताने कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटीचा क्लॉज तयार केला होता. कलाकारांनी न्यूड सीन देण्यास नकार देऊ नये आणि सेन्सॉर बोर्डाच्या कैचीतूनही सुटता यावं म्हणून तिने ही शक्कल लढवली होती. त्यामुळे एकच वाद उठलं होतं.जोधा-अकबर या टीव्ही सीरिअलवरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या शोमध्ये तिने जोधाची व्यक्तीरेखा चुकीची दाखवली होती. त्यामुळे राजपूत क्षत्रिय अखिल भारतीय सभेने तिच्याविरोधात जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे तिला ही सीरिअल बंद करावी लागली होती.दृश्यम या मल्याळम सिनेमाच्या निर्मात्यांसोबतही एकताचा वाद झाला होता. या सिनेमाची कहानी जापानी नॉव्हेल “द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स”वर आधारीत असल्याची अफवा होती. या कादंबरीचे कॉपीराईट आपल्याकडे असून दृश्यमच्या निर्मात्याने त्यावर सिनेमा बनवलाच कसा? असा तिचा सवाल होता.टीव्ही स्टार राजीव खंडेलवालसोबतही तिचा वाद झाला होता. एकताशिवाय मी यश मिळवू शकतो, असं राजीव म्हणाला होता. त्यावर पलटवार करताना मी तुला कोणत्याही शो आणि सिनेमात काम देणार नाही, असं एकताने म्हटलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सेटलमेंटही झाली होती.ट्रीपल एक्स या वेब सीरिजमध्ये तिने जवानांच्या पत्नींची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली होती. त्यामुळे माजी सैनिकांनी तिच्या विरोधात रोष व्यक्त करतानाच एकता आणि शोभा कपूर यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. बेगुसराय कोर्टाने त्यांच्या विरोधात अरेस्ट वॉरंट बजावलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button