पराभवाची हॅट्ट्रिक करायची असेल, तर राजन तेली यांनी निवडणुकीला सामोरे जावे- दिपक केसरकर.
पराभवाची हॅट्ट्रिक करायची असेल, तर राजन तेली यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान मंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले.केसरकर म्हणाले, ”एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ते पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर. नंतर भाजपचा एबी फॉर्म लावला. आता ते शिवसेना ठाकरे गटाकडून उभे राहणार आहेत. ज्या नारायण राणे यांनी त्यांना मोठे केले त्यांच्यापासून ते दूर गेले. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या माणसाला राणेंनी राजकीय प्रवाहात आणले. त्यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिले नाहीत.” ते पुढे म्हणाले,”आम्ही तीन पिढ्यांचे ऐश्वर्य सोडून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. आता मुख्यमंत्र्यांशी बोलून मी महाराष्ट्राच्या जबाबदारीतून मुक्त होऊन फक्त कोकण विकासाची जबाबदारी अंगावर घेणार आहे.’