
नागोठणेजवळ कंटेनर आणि टेम्पो यांच्या अपघातात मंडणगडातील टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील नागोठणे हद्दीतील चिकणी गावाजवळील गुलमोहर हॉटेलजवळ कंटेनर व टेम्पो यांच्यात बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक प्रदीप नारायण कासुर्डे (५५, रा. पिंपळगाव-मंडणगड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.हासिना इस्माईल खलफे (५६, रा. पिंपळगाव-मंडणगड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने नागोठणे प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.www.konkantoday.com