जागावाटपावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद टोकाला.
जागावाटपावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद टोकाला गेलाय. ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर तिढा सुटलेला नाही. त्यावरुन राऊतांनी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सक्षम नाहीत, असा हल्लाबोल केला.त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं टोकाची भूमिका स्पष्ट केली की, नाना पटोले जागा वाटपाच्या बैठकीत असतील तर ठाकरेंची शिवसेना बैठकीत जाणार नाही आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठकही होणार नाही.वाय बी चव्हाण सेंटरला दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक होती. मात्र पटोले बैठकीत नको, अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतल्यानं बैठकच रद्द झाली. विशेष म्हणजे ही बैठक रद्द होण्याआधी महाविकास आघाडीची मतदार यादीवरुन पत्रकार परिषदही झाली. या पत्रकार परिषदेतून राऊतांच्या सक्षम नसलेल्या टीकेला, पटोलेंनी उत्तरही दिलं. पण त्यानंतर जागा वाटपाची बैठक झालीच नाही.