
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिवि तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिवि तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.
मुंबई- थिवि उन्हाळी विशेष गाड्या (20 फेऱ्या)
01045 लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवि उन्हाळी विशेष ट्रेनला 6 मेपासून ते 24 मेपर्यंत (10 फेऱ्या) एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.01046 थिवि – लोकमान्य टिळक टर्मिनस उन्हाळी विशेष ट्रेनला 7 मेपासून 25 मेपर्यंत (10 फेऱ्या) एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई – मनमाड उन्हाळी विशेष (92 फेऱ्या)
02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – मनमाड दैनिक विशेष ट्रेनला 16 मे पासून ते 30 जूनपर्यंत (46 फेऱ्या) चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 02102 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दैनिक विशेष ट्रेनला 16 मे पासून ते 30 जूनपर्यंत (46 फेऱ्या) चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
सर्व उन्हाळी विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 4 मे पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
www.konkantoday.com