
कोकण रेल्वेने प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने लांबवला.
कोकण रेल्वे मार्गावरील संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री १ च्या सुमारास घडली होती. पंकज रतिलाल पटेल यांनी या प्रकरणी ३८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (क) नुसार गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com