हॉटेलमध्ये काम करणार्या तरूणाचा मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न.
हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेणार्या तरूणाने मानसिक तणावातून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. विष प्राशनाने या तरूणाला अत्यवस्थ वाटू लागल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मित्रासोबत रत्नागिरीत राहणारा हा तरूण शिक्षणासाठी रत्नागिरी येथे मित्रांसोबत वास्तव्य करतो. तसेच रत्नागिरी येथील हॉटेलवर काम करतो. १४ ऑक्टोबर रोजी त्याचे मित्र कामावर गेल्यानंतर हा तरूण आपल्या खोलीमध्ये एकटाच होता. यानंतर मानसिक तणावातून हा तरूण एका मेडिकलमध्ये गेला. त्या ठिकाणाहून त्याने झुरळ मारण्याचे विष खरेदी केले. घरी आल्यानंतर या तरूणाने विषारी द्रव प्राशन केले, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com