समाजसेविका ऍड. अश्विनी आगाशे यांना अरूणा पुरस्कार प्रदान.
समाजसेविका ऍड. अश्विनी आगाशे यांचा पोलीस निरीक्षक पवन कांबळे यांच्या हस्ते अरूणा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.श्रीमती अरूणा पाटील व देवेंद्र पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ मध्ये भाकर सेवा संस्थेची स्थापना केली. संस्थेचा ३१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते हे मान्यवर उपस्थित होते. कांबळे यांनी संस्थेच्या ३१ वर्षाच्या वाटचालीचे कौतूक केले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.www.konkantoday.com