रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?
: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.*या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. धंगेकरांनी एक्सवर पोस्ट शेअर करून काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावं जाहीर केली. परंतु, ट्वीट व्हायरल होताच धंगेकरांनी उमेदवारांच्या यादीची पोस्ट डिलीट केली. *रवींद्र धंगेकरांनी एक्सवर नेमकं काय म्हटलं होतं?*काँग्रसेचे नेते रवींद्र धंगेकरांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, परिवर्तनाच्या या लढाईत, शिलेदार आम्ही पहिल्या यादीचे..महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष व सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार…! दिल्लीश्वरााची कितीही ताकद येऊद्यात, हा कसबा जनतेचा आहे आणि राहणार…धंगेकरांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवारांना संधी मिळाले आहे? याबाबत जाणून घेऊयात.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. विजय वडेट्टीवार )(ब्रम्हपूरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख (लातूर), यशोमती ठाकूर (तेओसा), ऋतुराज पाटील (दक्षिण कोल्हापूर), बाबा मिस्त्री (मध्य सोलापूर शहर), धर्मराज कडाडी (दक्षिण सोलापूर), तर रवींद्र धंगेकर कसबा पेठेतून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या चौदा खासदारांनी विजयाचा झेंडा फडकवला. त्यामुळे राज्याच्या राजकीय मैदानात महाविकास आघाडीचं पारडं जड झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात भाषणांचा सपाटा लावून महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. तरीही महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या जास्त जागा जिंकून येतील आणि यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार असतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.