रत्नागिरी मतदारसंघात ४ हजार नवीन मतदार.
रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील ३५२ मतदार केंद्रांवर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील ४ हजार ४४० नवीन मतदार नोंदणी झाली आहे. दरम्यान सर्व मतदान केंद्रात सोयीसुविधांची कमतरता राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघात होणार्या मतदान प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी देसाई यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे उपस्थित होते.www.konkantoday.com