
पाणी गुणवत्ताविषयक रासायनिक व जैविक तपासणीचे अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होणार.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून प्राप्त होत होत्या. यावर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने नागरिकांना पाण्याची गुणवत्ता समजण्यासाठी संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणी गुणवत्ताविषयक रासायनिक व जैविक तपासणीचे अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरता जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात.