गॅस पाईप लाईनच्या खोदाईमुळे जिल्हा परिषद समोरील रस्ता धोकादायक, अपघाताची शक्यता.

रत्नागिरी शहरातील गॅस पाईपलाईनसाठी रत्नागिरी नगर परिषदेने गॅस लाईन कंपनीला कॉंक्रीटीकरणापूर्वी रस्त्याच्या बाजूने खोदाई करून पाईपलाईन घालण्यास परवानगी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आठ दिवसांपुर्वी गॅस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी पाईपलाईनसाठी मोठी खोदाई केली. मात्र आपले काम झाल्यानंतर तसाच मातीचा ढिगारा व खड्डा टाकून ते निघून गेले. त्यामुळे या खड्ड्यामुळे आणि मातीच्या ढिगार्‍यामुळे हा भाग धोकादायक झाला आहे. वारंवार या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच खड्ड्यांमुळे दुचाकीचे अपघातही होत आहेत.वास्तविक ते नगर परिषद प्रशासनावर यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र संबंधितांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button