उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दिला राणेना सिंधुदुर्गात मोठा धक्का, राजन तेली शिवसेनेत जाणार.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोकणामध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. राजन तेली आजच त्यांच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देणार आहेत.राजीनामा दिल्यानंतर तेली मातोश्रीवर जाऊन मशाल हाती घेणार आहेत. मिलिंद नार्वेकर हे राजन तेली यांची भेट घेणार आहेत.राजन तेली हे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. याआधी राजन तेली यांनी भाजपच्या मेळाव्यातून दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला होता. आज तेली हे शिवसेनेत प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button