आमदार राजन साळवी यांची उमेदवारी निश्चित, तयारीला लागण्याचे आदेश.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लांजा-राजापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विद्यमान 25 आमदारांना तिकीट देण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यात साळवी यांचा समावेश आहे राजापूर मतदारसंघातून शिवसेना नेते (शिंदे गट) आणि उद्योजक किरण सामंत हेही इच्छुक आहेत. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यास या मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत असेल. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याने ते अजून पूर्णपणे सक्रिय झालेले नाहीये. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारासाठी दिला जाणारा एबी फॉर्म साळवी यांना अद्याप प्राप्त झाला नाही; मात्र येत्या सोमवारी (२१ ऑक्टोबर) तो मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शिंदे शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत हेही या मतदासंघातून इच्छुक आहेत. त्यांनीही गेल्या काही महिन्यांपासून या मतदासंघात कामाला जोरात सुरुवात केली आहे. मात्र त्यांची उमेदवारीविषयी अद्याप काहीच स्पष्ट झाले नाही आहे. जर या मतदारसंघातून किरण सामंत यांना धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी मिळाली, तर या मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत बघायला मिळेल.