शंभर, दोनशेचा स्टॅम्प इतिहास जमा ; ५०० च्या स्टॅम्पसाठी अंमलबजावणी सुरु.
मुंबई : महायुती सरकारने ५०० च्या स्टॅम्पसाठीची अंमलबजावणी कालपासून सुरु झाल्याने आता १०० रुपयांच्या कामासाठी ४०० अधिक मोजावे लागणार आहेत.दरम्यान, (१६ ऑक्टोबर) शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांच्याच मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने ते इतिहास जमा झाले आहेत. सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयांचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे.सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठीही पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत.