
राष्ट्रवादीकडून चिपळूण-संगमेश्वरमधून उमेदवारी मिळावी, शौकत मुकादम यांची मागणी.
गेली ४० वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पदांवर काम करणारे पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाकडे त्यांनी तसा रितसर उमेदवारी मागणी अर्ज केला आहे.गेल्या अनेक वर्ष विविध क्षेत्राच्या तळमळीने काम करीत आहेत. चाळीस वर्षे अनेक आंदोलने, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही त्यांनी केले आहे. www.konkantoday.com