राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघातून संजय यादवराव मैदानात उतरणार.

समृद्ध कोकण संघटना अंतर्गत स्वायत्त कोकण समितीच्या माध्यमातून राजापूर-लांजा-साखरपा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी मंगळवारी राजापूर येथे केली. त्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा या मतदार संघातून उमेदवारीची पहिली घोषणा झाली आहे.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाकडून निवडणूक लढवलेले संजय यादवराव पुन्हा दहा वर्षानी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या मतदार संघात बहुरंखी लढत होण्याची शक्यता दिसू लागली आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत संजय यादवराव यांना सुमारे दहा हजार मते मिळाली होती. त्यावेळी भाजप पक्षाने राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातून कमळ या निशाणीवर प्रथम निवडणूक लढवताना या मतदार संघासाठी पूर्ण नवा चेहरा संजय यादवराव यांच्या रूपाने दिला होता. मात्र त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा भाजपने युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत हा मतदार संघ आपल्या तत्कालीन मित्रपक्ष अविभक्त शिवसेनेला सोडला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button