रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरूग्णालय जयसिंगपूर येथे हलविण्यात येणार असल्याचा आरोप करून आज रत्नागिरी प्रादेशिक रूग्णालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेसच्या नेत्या ऍड. अश्विनी आगाशे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते व अन्य मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थितांनी रत्नागिरीतील प्रादेशिक रूग्णालय हे ब्रिटीशकालीन असून या रूग्णालयाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असताना काही राजकीय मंडळी हे मनोरूग्णालय जयसिंगपूरला हलविण्याचा घाट घालीत असून त्यामागे मनोरूग्णालयाच्या मालकीची असलेली चौदा एकर जागा घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पालकमंत्री उदयसंबंधी यांनी हे आरोप पुराव्यानिशी फेटाळून लावले आहेत