प्रो लीग कबड्डी स्पर्धेत दसपटीचा शुभम शिंदे पाटणा पायरेटसचा कर्णधार.
अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रो लीग ११ व्या कबड्डी स्पर्धेला १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. अशातच कबड्डीमध्ये चिपळूणची मान अभिमानाने उंचावणारी गोष्ट म्हणजे दसपटकर शुभम शिंदे याची पाटणा पायरेटस संघाच्या कर्णधधारपदी झालेली निवड. या निवडीबद्दल कोळकेवाडीच्या शुभमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर शुभमचा भाऊ आदित्य हाही बंगाल वॉरियर्सकडून खेळणार आहे. www.konkantoday.com