पीएम विश्वकर्मा योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २७ कारागिरांना योजनेच्या लाभासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४ जणांना निधीचे वितरण झाले असून ६ जणांचे वितरण प्रस्तावित आहे. ११ जणांचे प्रस्ताव प्रलंबित असून ६ जणांचे प्रस्ताव नाकारले गेले आहे, अशी माहिती अग्रणी जिल्हा बँक प्रबंधकांनी दिली. लोकसंख्येच्या मानाने या योजनेचा लाभ घेणारे कारागिर कमी संख्येने दिसून येत आहेत.ग्रामीण भागातील कारागिरांना व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा नावाची योजना जाहीर केली. रत्नागिरी जिल्हात आतापर्यंत २७ प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वितरणासाठी प्राप्त झाले. www.konkantoday.com