देवरूखचा प्रसिद्ध कलाकार विलास रहाटे याच्या कलेची भुरळ शासकीय अधिकारी वर्गाला

देवरूखचा प्रसिद्ध कलाकार विलास रहाटे याच्या कलेची भुरळ शासकीय अधिकारी वर्गाला देखील पडली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी चित्रे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रेखाटली आहेत. ही चित्रे लक्षवेधी ठरत असून विलासच्या कलेचे कौतूक होत आहे.विलास याने चित्रकला, रांगोळीच्या माध्यमातून तालुका, जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. रांगोळीचे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. विलास याने मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ऍक्रॅलिक रंगाच्या माध्यमातून दोन लक्षवेधी चित्रे रेखाटली आहेत. मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्र, गणपतीपुळे, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ, बिथा राजवाडा, छत्रपती संभाजी महाराज यांचे सर्वात मोठे स्मारक, रत्नागिरीतील भैरी देवस्थान, कोकण रेल्वे, साने गुरूजी स्मृती भवन, रत्नागिरीतील फळे, मासेमारी, भातशेती, तसेच शिमगा, गणेशोत्सव, फुगडी, नमन या लोककला चित्रित केल्या आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button