
चिपळूण शहरात ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या कामाला २ दिवसात सुरूवात.
चिपळूण शहरासाठी साकारल्या जाणार्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या कामाला २ दिवसात सुरूवात होणार आहे. या कामांचा ठेका नाशिक येथील श्रमगाथा असोसिएशनला मिळाला आहे. या कंपनीला नगर परिषदेने कामाचे आदेश दिले असून कंपनीने लागणार्या साहित्याची ऑर्डरही दिली आहे. कोळकेवाडी धरणापासून शहरात ११६ कि.मी.ची पाईपलाईन नव्याने टाकली जाणार आहे. १५५ कोटी ८४ लाख रुपयांची ही पाणी योजना कंपनीला २ वर्षात पूर्ण करायची आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहराला खेर्डी-मळेवाडी व गोवळकोट येथे असलेल्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जात आहे.www.konkantoday.com




