
कोकण नगर येथील दोन्ही घटनांची चौकशी करण्यासाठीएक सदस्यीय विशेष पथकाची नियुक्ती.
कोकण नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचालनादरम्यान झालेल्या दोन घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्यामार्फत या घटनेची चौकशी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. चौकशीचा अहवाल तात्काळ देण्याचे सूचनाही श्री. कुलकर्णी यांनी केल्या आहेत.विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शहरातील कोकणनगर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन केले. या दरम्यान मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सकल हिंदू समाजाच्यावतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तर त्याच रात्री कोकण नगर येथे मोहल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चार्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला होता.