
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत पुन्हा ढासळली
कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम अपुरे असतानाच त्याच्या मागची साडेसाती अजूनही सुटत नाही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत पुन्हा एकदा ढासळली आहे . यावर्षी पावसाच्या सुरुवातीलाच यापूर्वी संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. बुधवारी पहाटे पुन्हा संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. सध्या एकरी वाहतूक सुरू असून प्रशासन घटनास्थळी पोहचले आहे.