पुण्यात अजित पवार गटाला धक्का! दिपक मानकर यांची विधान परिषेदवर नियुक्ती न झाल्याने ६०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!!

पुणे : मागील कित्येक महिन्यापासून राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्तया प्रलंबित होत्या. या नियुक्त्या कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले असताना विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काही तास अगोदर महायुतीकडून राज्यपालांकडे सात नावे पाठविण्यात आली होती. त्या सात सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दर्शविल्यानंतर आज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व सदस्यांना आमदारकीपदाची शपथ दिली.*हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे), मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे), पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महंत बाबुसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा), विक्रांत पाटील (भाजपा), चित्रा वाघ (भाजपा) यांचा विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून महायुतीमधील अजित पवार गटामध्ये नाराजी पाहण्यास मिळत आहे. अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मागील दीड वर्षाच्या काळात दिपक मानकर यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेऊन पक्ष शहर पातळीवर कायम चर्चेत ठेवले आहे. दिपक मानकर कुठे कमी पडले हे पक्ष नेतृत्वाने सांगावे, पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबात किती पदे देणार, असे म्हणत नाव न घेता छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या आमदारकीवर देखील आक्षेप घेण्यात आला. तसेच महिला प्रदेश अध्यक्षपद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीला. त्या पाक्षातील इतर नेत्यांना मोठे होऊ देत नाही, असा आरोप नाव न घेता रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आला. यासह अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित करित रुपाली चाकणकर यांच्याबाबत देखील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत ६०० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने पदाचा राजीनामा देत यापुढील काळात केवळ कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले. तसेच येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आमची गार्‍हाणी मांडणार असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button