
गुहागर तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे मंदिराच्या कळसावर वीज कोसळली.
गुहागर तालुक्यातील वेलदूर नवानगर येथील श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाला तडे गेल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास घडली. मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरातील वीज विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत.तालुक्यातील खाडी किनारी वसलेल्या नवानगर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखे श्रीरामाचे मंदिर येथील मच्छिमार बांधवांनी बांधले आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने बांधलेले मंदिर अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची साक्ष देतो या मंदिराचा सुमारे १५० फूट उंचीचा कळस आहे. सोमवारी रात्री परिसरात वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात मंदिराच्या कळसावर वीज कोसळली.www.konkantoday.com