आचार संहिता लागली पण मुख्यमंत्र्यांच्या भल्या मोठ्या कट आउट पोस्टरचे काय?
राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये जाहीर झाल्याने काल रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राजकीय नेत्यांचे पोस्टर व बॅनर्स हटविण्यास सुरुवात केली आहे रत्नागिरी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भली मोठी पोस्टर्स कट आउट आठ दिवसांपूर्वी लावण्यात आली होती ही भली मोठी कट आउट पोस्टर्स लावण्याचे काम मुंबई येथील एका एजन्सीने केले होते मात्र आता आचारसंहिता लागल्याने रत्नागिरी नगर परिषदे कडून व प्रशासनाकडून राजकीय नेत्यांची पोस्टर्स व बॅनर्स काल काढून टाकण्यात आली मात्र मुख्यमंत्र्यांचे शहरात उभारण्यात आलेली भली मोठी पोस्टर्स अजूनही दिमाखात उभी आहेत