रत्नागिरी शहरातील निवखोल रस्त्यावर तब्बल 34 हजार रुपयांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला अटक.
रत्नागिरी शहरातील निवखोल रस्त्यावर तब्बल 34 हजार रुपयांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 13) सायंकाळी 5.31 वाजता करण्यात आली.इबादुल्ला मुजीब पावसकर (वय 26, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सायंकाळी संशयित इबादुल्ला पावसकर हा निवखोल रोड येथे आपल्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीमध्ये 4 ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली