
गुहागर तालुक्यातील भातगाव येथे वऱ्हाडी मंडळींना जमवून विवाह सोहळा करणाऱ्या वर गुन्हा दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना गुहागर तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी येथे वऱ्हाडी मंडळींना जमवून विवाह सोहळा करणाऱ्या दोन्ही बाजूचे यजमान, पोलिस पाटील व भटजीवर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाह सोहळ्यास १०० ते १२० जणांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पोहोचवण्याचा संभव असलेले घातकी कृत्य केल्याप्रकरणी वर मुलाचे वडील ,वधूचे वडील , विवाह सोहळ्याला उपस्थित पोलिस पाटील , विवाह लावून देणारे भटजी यांच्यावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




