
प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्क वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर.
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्क वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे 70 हजार कुटुंबाचं लक्ष लागल होतेे.याबाबत मंत्रीमंडळ निर्णयाची प्रेस नोट नुकतीच महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली. संबंधित निर्णयाचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे .मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलना 56 व्या दिवशी यश आले. 1 जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहणार आहे.