नियोजित बेळगाव, चंदगड, सावंतवाडी या रेल्वेमार्ग प्रकल्पाला पुन्हा चालना.
नियोजित बेळगाव, चंदगड, सावंतवाडी या गेली दशको रखडलेल्या रेल्वेमार्ग प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विचार सुरू केला आहे.यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याशी बेळगांवचे खा. जगदीश शेट्टर यांची चर्चा झाली असून दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात हा रेल्वे मार्ग झाल्यास सावंतवाडी व्यापारी व पर्यटनदृष्ट्या नावारूपास येईल.बंदरे रेल्वेने जोडली जावीत या उद्देशाने हे सर्वेक्षण झाले होते. पुढे काही कारणाने हा प्रकल्प रखडला तो अद्यापही जैसेथेच आहे. हा जुना रेल्वे मार्ग झाल्यास सावंतवाडीला गतवैभव नक्कीच प्राप्त होईल. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग हे दोन्हीही शहराच्या बाहेरून गेल्याने शहराचे अर्थकारण खुंटले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास शहराच्या खुंटलेल्या विकासाला नवसंजीवनी प्राप्त होईल