
कोकण नगर प्रकरणी 140 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावेळी शहरातील कोकणनगर येथे काही नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने तणावपूर्ण वातावरण बनले हाेते. या प्रकरणी घोषणा देणाऱ्या गटातील १०० जणांवर, तर दुसऱ्या गटातील सुमारे ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाेलिसांनी याप्रकरणी पाच जणांना नोटीस बजावली असून, घाेषणाबाजी करणाऱ्यांचा शाेध सुरू आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पथसंचलनासाठी कोकणनगर येथील बागेच्या ठिकाणी एकत्र आले हाेते. तेथून पथसंचलनाला सुरुवात हाेताच काही जणांनी पथसंचलनाजवळ येऊन घोषणा दिल्या. या घाेषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी जमावाला रोखून धरल्याने वाद टळला. त्यानंतर संघाचे पथसंचलन कोकणनगरमार्गे शहराकडे आले.