
उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, राऊत बंधू संतापले
मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे कांजूर मार्ग पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस निघून गेले आहेत. या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.कार्यकर्त्यांना नेमक्या कोणत्या कलमाखाली ताब्यात घेतलं, त्यांची चूक काय होती. ते मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर होते, असा जाब शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० मिनिटाच्या आत सोडून द्यावं, अन्यथा पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी दिला आहे.www.konkantoday.com