
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी दहा टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द.
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी दहा टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.हंगामी दरवाढ रद्द करण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात एसटी बसने प्रवास करणार्यांच्या खिशाला आता ऐन दिवाळीत कात्री लागणार नाही. एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त यंदाही 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर अशी एका महिन्यासाठी हंगामी भाडे वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रस्तावित भाडेवाढ मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बस वगळता सर्व बसेससाठी लागू होती. मात्र, महामंडळाने प्रवाशांना दिलासा देत हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द केला.एसटी महामंडळाला सध्या दिवसाला सुमारे 22 ते 25 कोटी रुपये, तर महिन्याला 850 कोटींच्या आसपास उत्पन्न मिळते. हंगामी भाडेवाढीनंतर दिवसाला 6 कोटी तर महिनाभरात एसटी महामंडळाला 950 ते 1000 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती