आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभागाच्या माणिकमोती या दिवाळी अंकाचे प्रकाशन
आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभागाच्या माणिकमोती वर्ष दुसरे या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज रत्नागिरीत पार पडला. आम्ही सिद्ध लेखिका ही लेखन करणाऱ्या महिलांची संस्था असून रत्नागिरी , सिंधुदुर्ग , देवगड, गुहागर वरून महिला सदस्या उपस्थित होत्या. आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभागाने गेल्या वर्षी डिजिटल दिवाळी अंक काढला होता. यावर्षी आप्त किंवा परिचीतांना दिवाळी भेट देण्यासाठी छापील अंक काढण्याचे ठरले व त्याप्रमाणे अंक तयार झाला. आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा सुनेत्रा जोशी यांनी याप्रसंगी बोलताना लेखिकांना लिखाणाबाबत मार्गदर्शन केले.ज्याला जे उत्तम जमते त्याने त्यावर जास्त काम करून साहित्याच्या त्या प्रकारात सिद्ध व्हावे. तसेच नुसत्या लाईक च्या अंगठ्यावर न जाता स्वतःच्या लिखाणाचे आधी आपणच समिक्षक व्हावे. मिडीयावर पोस्ट करण्याची घाई करू नये तसेच शुद्धलेखन चुका टाळाव्यात असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला योगिता भागवत जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या संख्याशास्त्राच्या पदवीधर असून, लेखन करतात, इंग्रजी भाषेतील कवितांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. कार्याध्यक्षा ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी सर्वाचे स्वागत करून कार्यक्रम प्रस्तावना केली आणि दिवाळी अंक प्रकाशनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या अंकाची तांत्रिक बाजू उमा जोशी यांनी सांभाळली. तर प्रुफ रिडींग चे काम अर्चना देवधर आणि अनुराधा दिक्षीत यांनी केले. या कार्यक्रमाला अर्चना देवधर,लता जोशी, मेघना मराठे, कुंदा बापट, अनुराधा आपटे, विशाखा पाटोळे, अमृता नरसाळे,प्राजक्ता दामले, ऋतुजा कुलकर्णी, सुनेत्रा जोशी, उमा जोशी या रत्नागिरीतून, शर्वरी जोशी व मीनल ओक या गुहागर वरून, अनुराधा दीक्षित, साधना ओगले या देवगड वरून आणि विशेष पाहुण्या योगिता भागवत उपस्थित होत्या.