
रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर बेशूध्द पडलेल्या प्रवाशाचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू.
रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर बेशूध्द पडलेल्या प्रवाशाचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सुमारास घडली.शिवाजी सिताराम तावरे (रा.नालासोपारा ठाणे मुळ रा.शाहुवाडी कोल्हापूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. शिवाजी तावरे हे मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. सकाळी 6 वा. ते रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर उतरल्यानंतर ते बेशूध्द होउन पडले. तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.