
मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देतो, असे सांगून गुहागरमधील एका तरुणाची १३ लाखाची फसवणूक.
मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देतो, असे सांगून गुहागरमधील एका तरुणाची १३ लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. .आपण मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून एमबीबीएसला आपल्या मुलाचे ऍडमिशन करून देतो, असे खोटे सांगत गुहागर तालुक्यातील चिखली येथील किरण संपतराव सन्मुख या व्यक्तीला तब्बल १३ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.