मंत्रिमंडळात मोठा निर्णयमुंबईत प्रवेश करणाऱ्याआनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोल नाक्यावर हलक्या वाहनासाठी टोल माफी
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे.आज (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने टोलमाफी दिली आहे, पण ती नेमकी कोणत्या वाहनांसाठी आहे, असे विचारले जात आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय नेमका काय?
सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी दिली आहे. मुंबईच्या वेशीवर एकूण पाच टोल आहेत. या पाचही टोलनाक्यांवर टोल आकारला जातो. आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका असे हे पाच टोलनाके आहेत. या सर्वच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना आता टोलमाफी असेल. अवजड वाहनांना मात्र टोल द्यावा लागेल.