
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात, नवं सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग!
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.*भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ७३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून भारतीय राज्यघटनेच्या कलम २३९ आणि २३९ए अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजीचा आदेश जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५४ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीपूर्वी ताबडतोब मागे घेण्यात येईल.”२० जून २०१८ रोजी पीडपी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे व अन्य कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा न केल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तर २१ नोव्हेंबर २०१८ रोजी येथील विधानसभा भंग करण्यात आली होती.