
चिपळूणचे वन्यजीव रक्षक भाऊ काटदरे यांनी वणवामुक्त कोकणचा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या सभेत स्वीकृत
कोकणात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर वणव्यांची समस्या गंभीर रूप धारण करून जैवविविधतेला हानी पोहोचते. यावर मात करण्यासाठी चिपळूणचे वन्यजीव रक्षक भाऊ काटदरे यांनी वणवामुक्त कोकणचा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या सभेत आणला असून समितीने तो प्रस्ताव स्वीकृत केल्याने चिपळूण तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सर्वप्रथम राबविण्यात येणार आहे.
चिपळूण येथील वन्यजीव रक्षक भाऊ काटदरे यांनी हा प्रस्ताव आणला असून या प्रस्तावात वणवा लावणे कायद्याने गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणे, वणवामुक्त ग्राम समिती नेमणे, वणवामुक्त गाव पारितोषिके, वणवा त्वरित आटोक्यात आणण्याबाबत ग्रामसभेत ठराव व या बाबतची जनजागृती आदी बाबी या प्रस्तावात समावेश केल्या आहेत.
www.konkantoday.com