किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी.
किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी झाले तर बारामती मधील पर्यटकांमुळे तीन पर्यटकांना वेळीच मदत मिळल्याने त्यांचे प्राण वाचले.ही घटना रविवार (ता१३) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ले राजगडावर घडली.जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे किल्ले राजगडावर पर्यटकांची मोठी वर्दळ होती सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास बाले किल्ल्या जवळील असलेले मधमाशांचे पोळे उठल्याने येथील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये सुमारे 25 ते 30 पर्यटक किरकोळ जखमी झाले. गडावरती एकच गोंधळ निर्माण झाला.यामध्ये काही पर्यटकांनी स्वतःला वाचवण्यासाठी किल्ल्यावरती धावाधाव केली तर काही पर्यटकांनी गडावर असलेल्या पद्मावती तळ्यामध्ये उड्या घेतल्या. मधमाशांनी चावा घेतल्यामुळे गडावरील पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे व विशाल पिलावरे यांनी पर्यटकांना सूचना करत काही पर्यटकांना पुरातत्व विभागाच्या कार्यालयामध्ये आसरा दिला.दरम्यान जीव वाचवण्याच्या आकांताने काही पर्यटन गडाच्या खाली पळाले त्यामध्ये मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील प्रथम अहिरे (वय-२४) अंधेरी वेस्ट मुंबई या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो जखमी झाला