रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आणि किरण सामंत यांची सागवे गावात मिरवणूक निघाली.
राजापूर तालुक्यातील सागवे बुरंब येथील ग्रामस्थांनी किरण सामंत यांच्या कार्यप्रणाली वरती विश्वास ठेवत आज शिवसेनेचे धनुष्यबान हाती घेऊन शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बुरंबे गावातील तीन गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण वाढीने किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे जाहीर केले. राजापूर तालुक्यातील सागवे गाव येथील बुरंबे वाडी मधील विकासापासून वंचित असलेल्या गावाला विकास दृष्ट्या प्रगतशील करण्याचे काम किरण सामंत यांच्या माध्यमातून सुरुवात झाली असून एका बैठकीपूर्वी किरण सामंत यांनी या वाड्यांना जोडणारा रस्ता देणार असल्याचा शब्द दिला होता तो शब्द तंतोतंत पूर्ण करत सदरील रस्त्यांचे काम सुरुवात केले असून त्यांच्या शब्दाचा आदर करत आज बुरंबेवासीयांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेश दरम्यान ग्रामस्थांनी खंत व्यक्त करत म्हणाले गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणाच्या माध्यमातून विकासाच्या गोष्टी आणि थापा मारत आमच्या मतदारांची फसवणूक केली गेली. अनेक वेळा एकाच रस्त्याचे नारळ फोडून काम सुरू होणार असे सांगितले गेले मात्र अनेकदा नारळ फुटले मात्र रस्त्याचं काम काही सुरू होईना हा विषय जेव्हा किरण सामंत यांच्या कानावर टाकल्यानंतर किरण सामंत यांनी तात्काळ याची दखल घेत येथील ग्रामस्थांच्या शब्दाला मान देत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या बद्दल किरण सामंत यानाचे ग्रामस्थांनी आभार मानले. किरण सामंत यांनी यावेळी मार्गदर्शन केले ते म्हणाले,एकाच रस्त्याचा तीन वेळा नारळ फोडण्याच कार्यक्रम बंद होणार.बुरंबे गावातील तीन वाड्या जोडणाऱ्या रस्त्याचे कामाला दिलेला शब्द पूर्ण करत कामाला सूरवात केली. तुमच्या गावातील अनेक प्रश्न यापुढे सोडवायचे आहेत ते सोडवण्यासाठी आपण महायुतीचा आमदार या भागातून विधानसभेमध्ये पाठवणे गरजेचे आहे त्यासाठी आपण पूर्ण गाव एकत्र येत महायुतीच्या आमदाराच्या मागे उभे राहण्याचा निर्धार केला असून त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. तुमच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये मी तुमच्या पाठीशी उभा आहे. रस्ते पाणी वीज या आवश्यक बाबी देणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे मात्र त्या पलीकडे जाऊन आरोग्य ,शिक्षण या गोष्टीवरती भर देत या विभागातील शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून परिवर्तन झालेले दिसेल. असे किरण सामंत यांनी सांगितले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा शब्दही या पक्षप्रवेशा निमित्ताने किरण सामंत यांनी उपस्थितांना दिला. यावेळी गावकर सुहास मोंडे, गावकर एकनाथ आरेकर, गावकर कायंदे मधुकर जोशी, योगेश तांबे ,निलेश मोजे, संकेत सावंत देवेंद्र आंबेरकर, कमलेश मोंजे ,भूषा मोंजे,बाळकृष्ण भोसले माधुरी देवधर ,शिवाजी तांबे ,नंदकुमार तांबे ,रामदास तांबे ,संजय तांबे, प्रकाश कोलकर, तुषार तांबे सुनील साळुंखे प्रकाश पारकर यांच्यासहित गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात मध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख दीपक नागले, अजित नारकर, सुनील गुरव, रेखाताई कोंडकर, प्रशांत गावकर, जानवी गावकर यांच्या सहित पदाधिकारी उपस्थित होते.