बाबा सिद्दीकी यांचेवरशासकीय इतमामात दफनविधी.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान (दि.13) त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला.बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आलाय. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर हजारो लोकांकडून ‘नमाज ए जनाना’प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडिलांना निरोप देताना टाफो फोडलाय.बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या झाल्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, दिग्गज नेत्यांसह सर्वसामान्य लोकांची रिघ लागलेली पाहायला मिळाली. सिद्दिकी यांच्या वांद्रतील घराबाहेर फार मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली होती. त्यांचे कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर देखील दु:खा चा डोंगर कोसळलाय. मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.