स्वयंसेवक संघाच्या संचालनावेळी रत्नागिरी येथील कोकण नगर परिसरात घोषणा,पोलिस बंदोबस्तात वाढ


विजयादशमीच्या पूर्वसंध्येला कोकणात ratnagiricity रत्नागिरी शहरात वातावरण तापले आहे. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनावेळी रत्नागिरी येथील कोकण नगर परिसरात ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असुन या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रत्नागिरी येथील अनेक नागरिक पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर रात्री उशिरापर्यंत जमा झाले होते. या प्रकाराला चि थावणी देणाऱ्या संबंधित पुढाऱ्या वर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील विविध संघटनाचे नेते पोलीस स्थानकात दाखल झाले या सगळ्या प्रकारची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्या प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्याने रातोरात रत्नागिरी शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला कोकण नगर व त्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती काल शहरात दांडिया चा शेवटचा दिवस होता त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जाग होती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची प्रत्येकाची तपासणी करूनच सोडण्यात येत होते .दरम्याने रात्री उशिरा कोकण नगर भागात किरकोळ दगडफेकीचा प्रकारही घडला सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण असले तरी पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button