रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमधील भाट्ये समुद्र किनारी खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यामध्ये यश 10/10/2024 रोजी भाट्ये समुद्र किनारी, असणाऱ्या
पोलीस तपासणी नाका येथे एक अनोळखी इसम रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मदत मागण्यास आला. त्याच्या या अवस्थेवरून तेथील उपस्थित पोलीसांना असे लक्षात आले होते की, या व्यक्तीवर अज्ञात इसमांद्वारे गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आलेला होता. उपस्थित पोलीसांमार्फत त्यास लागलीच उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. जखमी इसमाला आपल्या कंठाजवळ गंभीर इजा झाल्याने आपल्यावर कोणी हल्ला केला याबाबत बोलता-सांगता आले नाही.या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील अंमलदारांना या गंभीर गुन्ह्याची तात्काळ उकल करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली.या पथकामार्फत काही तासातच जखमी इसमाची तसेच हल्लेखोरांबाबत सर्व प्रकारची माहिती काढण्यात आली. जखमी इसम हा गोवा राज्यातून रत्नागिरी येथे आलेला होता तसेच हल्लेखोर हे मूळचे झारखंड येथील रहिवासी असल्याचे व एम.आय.डी.सी, रत्नागिरी येथील एका नामांकित कंपनी मध्ये कामाला असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधाराने शोधून काढले.या पथकामार्फत कंपनी मधील उपस्थित व अनुपस्थित कामगारांची माहिती काढण्यात आली व यामध्ये असे निष्पन्न झाले की, दोन इसम कंपनी मध्ये दिनांक 10/10/2024 रोजी अनुपस्थित राहिले आहेत व घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 11/10/2024 रोजी दुपारी आपले सर्व साहित्य सामान घेऊन पळून जाण्याच्या उद्देशाने निघून गेलेले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे मार्फत या दोन्ही इसमांची ओळख पटवण्यात आली व लागलीच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील CCTV फुटेज तपासण्यात आले परंतु त्यामधून असे कळले की, दोन्ही संशयित इसम हे भावनगर एक्सप्रेस ट्रेन मध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघून गेलेले आहेत.काही तासातच भावनगर एक्सप्रेस ही रत्नागिरी मधून रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये विनाथांबा जाणार असल्याचे लक्षात येताच रायगड पोलीस दलाची व रेल्वे पोलीस दलाची मदत घेऊन मानगाव स्टेशनवर दोन्ही संशयितांना भावनगर एक्सप्रेस मधून जाताना ताब्यात घेण्यात आलेले आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 386/2024 बी.एन.एस कलम 109 अन्वये दाखल गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले 1) कार्तिक जानकी दिगार वय 23, रा. तोला आंबेडकर नगर, गाव-तंत्री, टुपकाढी जरिध जिल्हा बोकारो- राज्य झारखंड व 2) एक महिला, मूळ राहणार रा. फुसरो बाजार, जिल्हा बोकारो- राज्य झारखंड असे असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे खालील नमूद पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.1) पो.हवा/1188 श्री. सुभाष भागणे 2) पो.हवा/251 श्री. शांताराम झोरे,3) पो.हवा/477 श्री. नितीन ढोमणे, 4) पो.हवा/301 श्री. बाळू पालकर, 5) पो.हवा/338 श्री. विक्रम पाटील, 6) पो.हवा/1067 श्री. अमित कदम, 7) पो.हवा/1238 श्री. प्रविण खांबे, 8) पो.हवा/303 श्री. गणेश सावंत, 9) पो.हवा/1410 श्री. सत्यजीत दरेकर10) पो.हवा/444 श्री. रमिज शेख व 11) पो.ना निखिल माने, शहर पोलीस ठाणे.