
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दखल, आता कंत्राटी शिक्षक भरतीसाठी लागणार वयाचा दाखला.
कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये स्थानिक असल्याचा बोगस दाखला घेवून अर्ज दाखल होत असल्याबाबत येथील स्थानिक उमेदवार यांनी आवाज उठविल्यानंतर गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेत सरपंच व पोलीस पाटील यांनी दिलेले दाखले रद्द केले आहेत. या बोगस दाखल्यांना आळा घालण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना तहसीलदार यांच्याकडून वय अधिवास दाखला १४ ऑक्टोबरपर्यंत सादर करावा, असा आदेश गुरूवारी जारी केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण विभागात शाळांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती सुरू आहे. या भरतीसाठी सरपंच व त्या गावातील पोलीस पाटील यांच्याकडून स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला घेण्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे पोलीस पाटील यांच्याकडून दाखला घेवून जे या तालुक्यातीलच मूळ रहिवासी नाहीत, अशांनी बोगस दाखले मिळवले होते. परिणामी स्थानिकांसाठी ही अडचणीची बाब ठरली होती. यावर गुहागर तालुक्याबरोबरच रत्नागिरीमधूनही स्थानिक डीएड, बीएड यांनी आवाज उठवविला होता. गुहागरमध्ये ज्यांनी बोगस दाखले दिले होते. त्यांनी आपले दाखले परत नेले आहेत. मात्र आता तहसीलदार यांच्याकडील वय, अधिवास दाखला अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना जोडावा लागणार आहे. www.konkantoday.com